उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यासाठी निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीद्वारे रसायनशास्त्र प्रशाळेच्या एम एस्सी पेस्टीसाईडस अॅण्ड अॅग्रो केमिकल्स अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यासाठी निवड झाली.
सिन्जेंटा बायोसायन्स प्रा लि या कंपनीसाठी राहुल माळी व शुभांगी देसले या विद्यार्थ्यांची तर गुरगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेस्टीसाइड फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी या कंपनीसाठी गौरी पाटील आणि टीएम इनपुटस अॅण्ड सर्व्हिसेस प्रा लि, पुणे या कंपनीसाठी ललित पाटील अशा एकूण चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. रू ३ लाख ६० हजार ते ५ लाख या वार्षिक वेतनावर या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड झाली.
कक्षाचे उपसमन्वयक डॉ उज्ज्वल पाटील, समन्वयक प्रा रमेश सरदार, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा, डॉ अमरदिप पाटील, पेस्टीसाइड विभाग प्रमुख प्रा रत्नमाला बेंद्रे यांनी मुलाखतींचे व्यवस्थापन केले. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा धनंजय मोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.