एमजीएम विद्यापीठात ‘कन्यादान’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या भारतीय आणि विदेशी भाषा संस्थेतील मराठी विभागातील संशोधक प्रीती बनकर यांच्या ‘कन्यादान’ या दुसऱ्या कादंबरीचे सोमवार, दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कन्यादान’ कादंबरीचे प्रकाशन कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ दादा गोरे हे असणार आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत डॉ ऋषिकेश कांबळे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ महेश खरात हे कादंबरीवर भाष्य करतील. या कार्यक्रमास कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सामाजिकशास्त्र आणि मानव्यविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बनकर यांची यापूर्वी ‘प्रेमाचे दोन कोयंडे’ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अधिकाधिक वाचकप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय आणि विदेशी भाषा संस्थेचे संचालक प्रो के पी सिंह, मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ राम गायकवाड आणि डॉ मारुती गायकवाड यांनी केले आहे.