राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती निमित्त कृषी दिन साजरा
घोडेगाव : सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय आणि राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, घोडेगाव ता खुलताबाद येथे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन खुलताबाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका कृषी अधिकारी अधिकारी तारगे साहेब, कापूस पणनचे सोमवंशी साहेब, कृषी पर्यवेक्षक घायट साहेब, सदावर्ते साहेब संस्थेचे पदाधिकारी द्वारकादास पाटील जाधव, प्रशासकीय अधिकारी संजय गोमलाडु सर हे होते.
मान्यवरांच्या हस्ते स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी विषयक खुप मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सर यांनी आभार मानले. नंतर गोमलाडु सर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयास 15 देशी झाडे भेट म्हणून दिलेली वृक्ष मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.