मुक्त विद्यापीठाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुक्त शिक्षण चळवळीची साडेतीन दशके
नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या मूळप्रवाहात आणण्याचे काम केले आहे. विद्यापीठाच्या या साडेतीन दशकाच्या वाटचालीत आज बरेच असे विद्यार्थी आहे, ज्यांनी मुक्त विद्यापीठाचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत आहे. तसेच विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी कृषी आणि इतर क्षेत्रात देखील यशस्वी व्यावसायीक झाले आहे.
1 जुलै 1989 साली स्थापन झालेल्या मुक्त विद्यापीठाचा 35 वा वर्धापनदिन. या वर्धापनदिनाचे औचित्यसाधून विद्यापीठात मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे – सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठ ध्वजारोहन झाल्यानंतर, कुलगुरूंचे मनोगत होईल.
तसेच जेष्ठ समिक्षक आणि विद्यापीठाचे माजी संचालक डॉ रमेश वरखेडे यांचे ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ काल, आज व उद्या’ या विषयावरील व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. याबरोबरच कुलगरू प्रा संजीव सोनवणे यांच्या हस्ते सरिता खोबरे यांच्या स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली.