मुक्त विद्यापीठात ‘रिशेपिंग एज्युकेशन – टुडे अँड टूमारो’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील शिक्षण हे सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण असेल – कुलगुरू प्रा संजीव सोनवणे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, बहाई अकॅडमी तसेच टि जे महाविद्यालय, खडकी, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘रिशेपिंग एज्युकेशन – टुडे अँड टूमारो’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस पुणे विभाग स्तरीय कार्यक्षेत्रामधून 210 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त करतांना NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांना मिळालेली दुहेरी पदवी प्राप्त संधी, प्रचार आणि प्रसार, शिक्षण प्रत्येकाच्या दारी पोहोचले पाहिजे यासाठी काय करायचे हे समजणे गरजेचे आहे असे सांगितले. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील शिक्षण हे सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण असेल, तसेच सर्व अभ्यासक्रम बहुविद्याशाखिय असतील.
येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठ महास्वयम्, AI चा शिक्षणात वापर तसेच तंत्रज्ञानाचा मुल्यमापनात वापर यासाठी तत्पर राहील. अशी माहिती आपल्या मनोगतात कुलगुरूंनी दिली. तसेच सातत्यपूर्ण मूल्यमापनास महत्व दिले पाहिजे, सर्वांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाणे, तसेच परीक्षेचा ताण नसणे असे अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
याप्रसंगी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या केंद्र संयोजक व महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी याविषयी समस्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्वांना नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याविषयी उत्तम काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ केशवराज तुपे, सहसंचालक, पुणे विभाग, पुणे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले, तसेच सर्वांना यामध्ये आणखी कसे सहभागी करता येईल याविषयी माहिती दिली.
खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रमुख मान्यवर कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, तसेच सहसंचालक पुणे विभाग पुणे डॉ केशवराज तुपे यांचा सन्मान केला. कार्यशाळेस खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी टि जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी आपल्या प्रस्ताविकामधून महाविद्यालयात शैक्षणिक धोरण याची अंमलबजावणी किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे राम ताकवले स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निग च्या संचालिका डॉ कविता साळुंके यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली तसेच विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ व्ही बी गायकवाड यांनी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. बहाई अकॅडमी पाचगणीचे डॉ लेसन आजादी व डॉ शशी गायकवाड यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विविध महाविद्यालयातून अनेक मान्यवर प्राचार्य तसेच केंद्र संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ शितल रणधीर यांनी केले, तर आभार कार्यशाळा समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक डॉ निलेश काळे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्राचे सहाय्यक बाबा गायकवाड वृषाली तावरे, प्रा अमृता खेंदाड, प्रा अविनाश कोल्हे, प्रा स्वामीराज भिसे, डॉ सुजाता भालेराव, डॉ ज्योती शिंदे, डॉ नागेंद्र जंगम, प्रा मयूर कडणे, डॉ पद्माकर घुले प्रा शुभम पटारे, डॉ शैलेंद्र काळे, अमोल अमराव, आकाश परमार, आशिष कनल्लू, विजय दुदुस्कर, रमेश शेलार, श्रेयश इंगवले, पवन पवार, वैभव पवार, तसेच मुक्त विद्यापीठातर्फे डॉ विद्यादेवी बागुल, डॉ वसुदेव राऊत, डॉ सचिन पोरे, हरिष काळे, राधिका शिंदे, तन्मय बोरसे, ऋतिक घुगे यांनी योगदान दिले.