CSMSS महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
राजर्षी शाहू महाराज : सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ -पद्माकरराव मुळे
छत्रपती संभाजीनगर : जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची जयंती. कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ किसनराव लवांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती होती.

यावेळी डॉ किसनराव लवांडेजी, संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी पद्माकरराव मुळे यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. छत्रपती शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला.
या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली. मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, कृषी महाविद्यालय संचालक डॉ दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ उल्हास शिंदे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, अजित सीड्स सरव्यवस्थापक सुरेंद्र देशमुख, मनुष्यबळ विकास अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.