राजर्षी शाहू जयंती निमित्त शिवाजी विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन
क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या कुस्ती संकुलाचे उद्घाटन होणार
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्यान, कुस्ती संकुलाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ठीक १०:३० वाजता कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये महाराजांना अभिवादन करण्यात येईल.
सकाळी ११:०० वाजता क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या कुस्ती संकुलाचे उद्घाटन हिंद केसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल. हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ शिर्के असतील. दुपारी ०१:०० वाजता ज्येष्ठ शाहू संशोधक डॉ रमेश जाधव यांचे विशेष व्याख्यान विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तरी, या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.