विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता अमरावती विद्यापीठात प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाकरीता दि २५ जून, २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात प्राचार्य, प्रशासक, महाविद्यालयीन स्टाफ सदस्य, प्रवेश समिती सदस्य आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता प्रादेशिक कार्यशाळेचे प्रवेश नियमन प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, मुंबई यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार असून प्रवेश नियमन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे पी डांगे, कृषी शिक्षण विभागाचे चे प्रशासकीय अधिकारी तथा परीक्षा समन्वयक डॉ मंगेश निकम, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सिद्धेश नीर, तंत्र शिक्षण विभागाचे राजेंद्र लोंढे, ललित कला विभागाचे डॉ विजय सकपाळ व प्रदीप कुमावत, उच्च शिक्षण विभागाचे डॉ घनश्याम केदार कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
तरी आयोजित प्रादेशिक कार्यशाळेला सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी केले आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहितीकरीता उपकुलसचिव राहुल नरवाडे यांचेशी प्रत्यक्ष दूरध्वनी क्र ७०२०६९७००७ यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.