यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात जागतिक योग दिन साजरा
नाशिक : जागतिक योग दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात योग सरावाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सुजाता दराडे यांनी दोर व बंध यांच्या सहाय्याने योग उपचार याचे मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात योगाचे महत्व विशद केले. दैनंदिन व्यवहारात संगणक व मोबाईलच्या वाढत्या वापरामध्ये आरोग्य बिघडत आहे, ताण वाढत आहेत. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेऊन रोजच्या रोज सराव करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावर्षीची योग दिनाची थीम होती ‘योग स्वतः साठी आणि समाजासाठी’. योग सरावात मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, संचालक डॉ जयदीप निकम, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, डॉ कविता साळुंके, किशोर राठोड, रश्मी रानडे, डॉ सुकेनकर, अनंत खळेकर, तसेच विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे शैक्षणिक संयोजक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ संगिता पाटील यांनी केले.