मिल्लीया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जून २०२४  शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रो हुसैनी एस एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रो मिर्झा असद बेग, डॉ शेख रफीक, प्राध्यापिका डॉ शेख एजाज परवीन, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रो फरीद अहमद नेहरी, नॅक समन्वयक डॉ अब्दुल अनिस यांची उपस्थिती होती.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रो मिर्झा असद बेग यांनी केले. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात येतो, यानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमाबद्दल सांगितले व योगाची आठ अंगे आहेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत. सर्वांनी सकाळी लवकर उठून योगासन व प्राणायाम केला तर आपले आरोग्य निरोगी व सुंदर होईल असे सांगितले.

क्रीडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ सय्यद हनिफ  यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्व सांगून  प्राणायाम, अनुलोम-विलोम व इतर योगा प्रकार यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योगाचे विविध प्रकार योगासने व योगा करण्याच्या शास्त्रीय पद्धती यावर सखोल माहिती दिली. योग एक अध्यात्मिक शिस्त आहे जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. तसेच निरोगी आरोग्यासाठी योगाची आवश्यकता सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांनी योगामुळे शारीरिक स्वास्थ्य बरोबरच मानसिक व भावनिक स्वास्थ्य चांगले राहते. विद्यार्थ्यांनी नियमित योगा करावा असे सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page