एमजीएम विद्यापीठात आर्किटेक्चर क्षेत्रातील करियरच्या संधी विषयावर कार्यशाळेचे आयोजन
विद्यार्थी आणि पालकांसाठी आर्किटेक्चर क्षेत्र जाणून घेण्याची एक नामी संधी
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्चर विभागाच्यावतीने शनिवार, दिनांक २२ जून २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती, करीयरच्या संधी आणि एमजीएम विद्यापीठाने अवलंबलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ही एक दिवसीय कार्यशाळा सर्वासाठी नि:शुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्हिज्युअल प्रेझेंटेशन, डिझाइन वर्कशॉप आणि ‘आर्किटेक्चरमधील करिअर संधी’ या विषयावर तज्ञांचे विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदरील कार्यशाळा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठीही असून यामध्ये पालक आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. विशेषतः या कार्यशाळेत विद्यार्थी आणि पालकांना शहरातील प्रतिष्ठित वास्तूविशारद यांच्यासोबत यावेळी संवाद साधता येणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्चर विभागास विद्यार्थी भेट देऊ शकतात. तसेच या कार्यशाळेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९४२२७११८८१, ९४२२२९४३०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.