उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या वारकऱ्यांचे विशेष अभियानाने निरोप
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक १८ जून रोजी मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ‘प्लास्टिक मुक्त – स्वच्छ वारी – स्वस्थ वारी – हरित वारी – निर्मल वारी’ हे अभियान राबविले.
या अभियानाची सुरुवात कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आहे. मुक्ताई पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना जेवण वाढतांना प्लास्टीकचा वापर करण्यात आला नाही. जेवणासाठी केळीचे पान व पाण्यासाठी कागदी ग्लास वापरण्यात आले. रा से यो च्या वतीने यापूर्वी देखील वारकऱ्यांमध्ये प्लास्टीक मुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. संत मुक्ताबाई संस्थान मेहून व संत सद्गुरू सखाराम महाराज अमळनेर यांच्या प्रेरणेने सहभागी झालेल्या रा से यो स्वयंसेवकांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. या वारीत वृक्षारोपण, व्यसनमुक्ती याबाबतही माहिती देण्यात आली. श्रीमती जी जी खडसे महाविद्यालय आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील रा से यो स्वयंसेवक उपस्थित होते.
या वारीमध्ये अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ आय डी पाटील, विद्यापरिषद सदस्य प्राचार्य डॉ एच ए महाजन राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य प्राचार्य डॉ जे बी अंजने, रा से यो संचालक डॉ सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ दिनेश पाटील, विभागीय समन्वयक, डॉ जयंत नेहते, कार्यक्रमाधिकारी डॉ बावसकर, डॉ ए जी कुलकर्णी, डॉ ताहिरा मिर, डॉ विजय डांगे, डॉ वाघमारे उपस्थित होते.