पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात ‘प्राणायाम’ या विषयावर व्याख्यान संपन्न
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्राणायाम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगशिक्षिका माधुरी चव्हाण यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना योग विषयी माहिती देऊन त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे चव्हाण साहेब आणि माजी प्राचार्य गौर सर यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस आर मंझा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा शिवाजी शिरसाट, डॉ राजु वनारसे, डॉ शिल्पा जिवरग आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिल्पा जिवरग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा शिवाजी शिरसाठ यांनी केले.