सौ के एस के महाविद्यालयास नॅकचा ‘अ’ दर्जा

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयास नॅक मुल्यांकन ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी कळवले आहे. दिनांक 27 व 28 मे 2024 दरम्यान नॅक पुर्नमुल्यांकनाची चौथी सायकल नुकतीच पार पडली. महाविद्यालयास नॅकची समिती अध्यक्ष डॉ रत्नेश गुप्ता, देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदोर (मध्यप्रदेश), समन्वयक डॉ अनुपम महाजन, दिल्ली विद्यापीठ दिल्ली, सदस्य डॉ मोहेंदर कुमार गुप्ता, पंडीत जवाहरलाल नेहरू शाासकीय पदव्युत्तर महाविद्यालय फरिदाबाद (हरियाणा) यांनी महाविद्यालयाचे मुल्यांकन केले.

यामध्ये क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाट्यशास्त्र, ग्रंथालय, मुलींचे वसतिगृह, विज्ञान विभाग, वाणिज्य विभाग, कला विभाग, एनएसएस, एनसीसी, कार्यालय, आयक्युएसी आणि प्राचार्य कार्यालय आदीं विभागांना भेटी दिल्या. तसेच संस्था चालक, शिक्षक, पालक, आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या प्रगतीत विद्यार्थी पालक यांचा सहभाग आणि योगदान या विषयी चर्चा करून आपला अहवाल सादर केला. महाविद्यालयाची  मागील पाच वर्षाची एकूण प्रगतीचे सात निकषांच्या आधारे मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयास 3.15 (सी जी पी ए) मिळाला असून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. हा दर्जा सातत्य टिकवत सलग तिसर्‍यांदा प्राप्त  झाला आहे.

Advertisement

महाविद्यालयाच्या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर काळे, सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ दीपा क्षीरसागर, सहसचिव योगेश भैय्या क्षीरसागर तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस व्ही क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ सतीश माऊलगे, आयक्युएसी समन्वयक डॉ सोनाजी गायकवाड, कमवि उपप्राचार्य डॉ एन आर काकडे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने  तसेच आयक्युएससी सदस्य डॉ एस के जोगदंड, डॉ ए एस खान, डॉ आर एम गुळवे, डॉ एस एस जाधव, डॉ डी डी रामटेके, डॉ जी डब्ल्यु श्रीमंगले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page