शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यानी पोहरा जंगलात सीडबॉल रोवून राबविला बीजारोपणाचा उपक्रम
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती, ब्राीजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पोहरा येथील जंगलात 2 हजार 39 सीडबॉल रोवून यशस्वीपणे बीजारोपणाचा उपक्रम पार पाडला.
सदर उपक्रम विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ एच पी नांदुरकर, डॉ रंजना राऊत व गटप्रमुख निलिमा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर सरकटे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील डॉ उमेश कडू यांच्या मार्गदर्शनात राधिका गावंडे, ब्राजलाल बियाणी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ एन एच शहारे यांच्या मार्गदर्शनात रसिका वैद्य, विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील डॉ प्रतिक वानखडे यांच्या मार्गदर्शनात वनिता सगणे तसेच गटप्रमुख निलिमा तायडे या संशोधक विद्यार्थ्यानी यशस्वीरित्या उपक्रम राबविला.
डॉ एच पी नांदुरकर यांनी सीडबॉल तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले, तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी गटप्रमुख निलिमा तायडे तसेच जीवन वडाई या विद्यार्थ्यांनी मोठे सहकार्य केले.