डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात योग-प्राणायाम शिबीराचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवार पासून (दि १७) पाच दिवसीय योग – प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . पहिल्या दिवशी शिबिरात २२० जणांनी सहभाग घेतला. क्रीडा विभाग, योग विभाग, शारीरिक शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग व छत्रपती संभाजीनगर योगा संघटना यांच्या सहाकार्याने हे योग-प्राणायाम शिबीर होत आहे. विद्यापीठ बॅडमिंटन हॉलमध्ये या शिबिरास सुरुवात झाली. व्यवस्थापन परिषदच्या सदस्य डॉ योगिता तौर होके पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले.
या प्रसंगी भारतीय योग परिषदेचे प्रधान डॉ उत्तम कळवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ विष्णू उढाण, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, डॉ पंढरीनाथ रोकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या डॉ निर्मला जाधव, योगशिक्षक रमेश डकले, प्र क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप आदींची उपस्थिती प्रमुख होती. मानसिक आरोग्य व योगासन यावर योग शिक्षक डॉ विष्णू उढाण यांनी योग अभ्यास २२० साधकांकडून करून घेतला. त्त्यांना संगीत विशारद आदित्य कटारे, तबलावादक उदय पाटील, गायिका सानिका कुलकर्णी आदींनी साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजितसिंह दिक्कत यांनी तर आभार सुरेंद्र मोदी यांनी मानले.