महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 26 वा वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पंदन 2024 मधील विजेते स्पर्धक व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून सांस्कृतिक मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप, अविसेप, विसेप समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता विद्यापीठातर्फे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सांस्कृृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंबीय एकत्र येतात एकमेकांत संवाद हेातो, विद्यापीठ परिसराची ओळख होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा हा व्यापक दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठाचा सन 2024 मधील स्पंदन राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेतील निवडक विजेते स्पर्धेकांनी कलाप्रकार सादर केले. यामध्ये यवतमाळचे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथमेश इंगळे, खामगांव येथील पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वेशा कुलकर्णी, अंबरनाथ येथील बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयातील धु्रव वालावलकर, मुंबई येथील सुनंदा प्रवीण गंभीरचंद इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील रोशनी मोहम्मद, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दर्वेश देशपांडे, पुणे येथील सुमतीभाई शाह आयुर्वेद महाविद्यालतील चिन्मयी मुरुडकर, नांदेड येथील नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातील गुंजन शिरभाते, नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील रेवती कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राची विद्यार्थीनी रसिका साळवे तसेच सुनंदा प्रवीण गंभीरचंद इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीतगायन, समूह गीतगायन व नृत्य आदी कला प्रकारांचे सादरीकरण केले.
वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन
विद्यापीठाचा 26 वा वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ प्रांगणात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप., अविसेप, विसेप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठ गीत वाजविण्यात आले. विद्यापीठाचे विभागीय केंद्र, राज्यातील 569 संलग्नित महाविद्यालयात वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यापीठाचे विद्युत अभियंता संजय मराठे, सहायक कुलसचिव संदीप राठोड, सहायक कुलसचिव प्रमोद पाटील, अमृता खर्डेकर, रविंद्र रांधव, चेतना पवार, आरती आहेर, प्रशांत कोठावदे, सागर मुंजवाडकर, शैलेंद्र जमदाडे, कांचन भुधर, उल्हास कुलकर्णी यांनी विविध हिंदी व मराठी भाषेतील गीतगायन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ दवेंद्र पाटील यांनी तसेच सहायक कुलसचिव संदीप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनामिमित्त प्रशासकीय इमारतीस करण्यात आलेली रोषणाई, सहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.