सौ के एस के महाविद्यालयात मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती
बीड : येथील सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर व कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटशिक्षणाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून व विद्यार्थ्यांना मतदान शपथ देऊन मतदार जनजागृती करण्यात आली.
लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सौ के एस के महाविद्यालयामध्ये महाविद्यालया समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने विद्यार्थी, विद्यार्थिंनींची व कर्मचार्यांची मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा अनिल जाधव व डॉ पांडूरंग सुतार यांनी परिश्रम घेतले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सतीष माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, क्रीडा संचालक डॉ भागचंद सानप, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.