ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी तर्फे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा डॉ विश्वनाथ दा कराड यांना मानद डी लिट प्रदान

यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (बीवाययू) तर्फे विश्वधर्मी प्रा डॉ विश्वनाथ दा कराड यांना मानद डी लिट प्रदान

पुणे : शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा डॉ विश्वनाथ दा कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) मानद डी लिट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. बीवाययूचा २०२४ बॅचच्या दीक्षांत समारोह गुरूवारी २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बीवाययूचे अध्यक्ष डॉ सी शेन रीस, एल्डर डी टॉड क्रिस्टोफरसन, एल्डर रोनाल्ड रासबँड, एल्डर गेरिट गाँग, रॉन गनेल, रिचर्ड नेल्सन, किंग हुसेन, डॉ अशोक जोशी आणि बोर्डाचे इतर विश्वस्त सदस्य उपस्थित होते. डीलिट पदवी प्रदान करताना अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा डॉ विश्वनाथ दा कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतूक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापनेला देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचाचे कौतुक केले.

Advertisement

डीलिट स्वीकारल्यानंतर विश्वधर्मी प्रा डॉ विश्वनाथ दा कराड म्हणाले, ” शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्ब कम आणि विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजचे आहे.”

“अमेरिकेतील आघाडीचे विद्यापीठ बीवायू व एमआयटी डब्ल्यूपीयू यांच्यात सहकार्य निर्माण व्हावे, तसेच जगात शांती संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण प्रणालीच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी जगातील इतर विद्यापीठांचाही समावेश होईल. अशी डॉ कराड यांनी आशा  आहे.”

“माझ्या जीवनावर महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यासारख्या थोर तत्वज्ञ संताचा आणि डॉ अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांचा चिरस्थायी प्रभाव पडला आहे. माझी मोठी बहिण प्रयागअक्का कराड यांचा ही प्रभाव आहे. त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.” असे उद्गार डॉ विश्वनाथ कराड यांनी या प्रसंगी काढले.

या समारंभात बीवायूच्या १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विविध विषयातील पदवी पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदव्यांचा समावेश होता. या दीक्षांत समारोहात सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page