नुतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा फार्मास्युटिकल कंपनीला अभ्यास दौरा
कवठे महांकाल : राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नुतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विटा एम आय डी सी मधील जी जे सी फार्मास्युटिकल कंपनीला शैक्षणिक भेट देऊन तेथील माहिती घेतली. संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अमोल पाटील व नुतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे हित, सर्वांगीण विकासासाठी व शिक्षण पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कंपनीविषयी माहिती असावी यासाठी महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना फार्मा इंडस्ट्रीचे कामकाज व प्रक्रिया दाखवण्यात आली. कंपनीमध्ये औषध कशा प्रकारे तयार होते, कच्चा माल कोणता लागतो या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. फ्लो ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यामधे डिस्पेन्सिंग, ग्रनुलेशन, कॉम्प्रेशन, कोटिंग, फायनल पॅकेजिंग, प्रॉडक्ट डिस्पैच याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर संशोधकीय प्रोजेक्ट बद्दलची माहिती मिळाली. या दौऱ्याचे आयोजन व नियोजन प्रा प्रशांत ऐवळे व प्रा मनोहर केंगार यांनी केले.