उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या दोन विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस (पॉलीमर केमिस्ट्री व ऑरगॅनिक केमिस्ट्री) मधील दोन विद्यार्थ्यांची निवड चेंबुर, मुंबई येथील गॉर्गी ह्युटन्स अलबरटस प्रा लि या कंपनीसाठी झाली. एम एस्सी पॉलिमर केमिस्ट्री व एम एस्सी ऑरगनिक केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
कंपनीचे उपाध्यक्ष बळवंत चौधरी हे उपस्थित होते. २० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मुलाखत दिली होती. या पैकी प्रियंका पाटील (पॉलिमर केमिस्ट्री) व संदीप राजपुत (ऑरगनिक केमिस्ट्री) या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक वेतन रू ४ लाख देण्यात आले. कक्षाचे समन्वयक प्रा रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. केमिकल सायन्सेसचे डॉ अमरदिप पाटील, डॉ विकास गिते यावेळी उपस्थित होते. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा धनंजय मोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.