विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिभागातील विद्यार्थ्यांचे यश

वर्षभरामध्ये एकूण ३२ विद्यार्थ्यांची बाजी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये विविध सांख्यिकी पदावर मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. शासनाच्या विविध विभागांद्वारे यासाठी पदभरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचानालयाद्वारे संशोधन अधिकारी पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सरिता बाळासो वारके व नीलम तानाजी पाटील यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज विठ्ठल झांबरे व निकेत गणेश जाधव यांची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मार्फत राष्ट्रीय पोषण संस्था- हैदराबाद व राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान, पुणे येथे येथे तांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. मुकुंद शशिकांत बाचनकर, सुवर्णा दगडू मळावे, सोनम महादेव लंगुटे, आदिनाथ तुकाराम पाटील व विशाखा विलास पाटील यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दलाचे प्रमुख) कार्यालय येथे वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक म्हणून रुजू झाले आहेत.

Shivaji University, Kolhapur, suk

 पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, विशाल बापू झिटे, प्रतीक सदाशिव दामते, ओंकार प्रभाकर पाटील, प्राजक्ता महादेव जाधव, माधुरी विनायक नाझरे, शुभांगी महादेव स्वामी, मेघना नारायण साळवे, आदिनाथ तुकाराम पाटील, दिपाली दशरथ करणे, वैभव रामदास सुराशे, विक्रांत माणिक रास्ते, उत्कर्ष उत्तम शेलार, सोनम तात्यासाहेब साठे, सृष्टी शिवाजी मोरे, निकेत गणेश जाधव, स्वप्नाली प्रदीप पवार, शुभांगी मारुती शेंडगे, सोनम महादेव लंगुटे, सुवर्णा दगडू माळवे, किरण मल्हारी चोथे, आणि विशाखा विलास पाटील अशा एकूण २२ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांख्यिकी अन्वेषक म्हणून निवड झाली आहे. त्याचबरोबर दादासाहेब गोडसे, शिल्पा पाटील, शाईन मुजावर, सुनील मोरे, ओंकार पाटील, शुभांगी पाटील, कृष्ण माळी, श्रुती ओतारी आणि अशोक भोसले अशा एकूण ०९ विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड होऊन रुजू झाले आहेत.

Advertisement

विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणारे आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून व हालाखीच्या परिस्थितीतून आलेले आहेत; त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. संख्याशास्त्र  विभागाद्वारे विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी, भारतीय रिजर्व बँक, भारतीय रेल्वे, अर्थ व सांख्यिकी संचनालय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ इत्यादीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, विभागप्रमुख डॉ एस बी महाडिक तसेच अधिविभागातील सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

यापूर्वीही संख्याशास्त्र अधिविभागाच्या विध्यार्थ्यानी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी मार्फत भारतीय सांखिकी सेवेत, तसेच भारतीय रिजर्व बँक, भारतीय रेल्वे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (एमपीएससी) मार्फत अर्थ व सांख्यिकी संचनालय या द्वारे मंत्रालय तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन विभागामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, संशोधन अधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये सांख्यिकी अधिकारी म्हणून १०० हून अधिक विध्यार्थी कार्यरत आहे. काही माजी विध्यार्थी त्या त्या संस्थेमधील असणाऱ्या प्रमुख पदावर कार्य करून सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्रामधील बहुतेक सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी या अधिविभागाचा किमान एक तरी विध्यार्थी कार्यरत आहे. हि बाब शिवाजी विद्यापीठासाठी गौरवास्पद आहे. संख्याशास्त्र विषयाची उपयोगीतता लक्षात घेता नजीकच्या भविष्य काळात शासकीय क्षेत्रात अजून संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे हा आलेख दिवसेंदिवस वाढतच जाईल यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page