शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची परदेशाकडे यशस्वी वाटचाल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागातील दोन विद्यार्थ्यांची दक्षिण कोरिया आणि फिनलंड येथील नामांकीत विद्यापीठांमध्ये पी एचडी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. फिनलंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ उलू, लूक हेलसिंकी, येथे रचना पोतदार (रा कोल्हापूर) यांची पी एच डी साठी उच्च विद्यावेतनासहित निवड झाली आहे. रचना, बायो बेस्ड अँटी-व्हायरल्स या विषयावर २०२४-२८ या काळासाठी काम करणार आहे. संशोधनासाठी तिला दरमहा 2000 युरो म्हणजेच १,७८,०००/- रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे.

Advertisement

तसेच दक्षिण कोरिया मधील क्यून्ग ही युनिव्हर्सिटी, येथे विनय पाटील (रा कोल्हापूर) यांची इलेक्ट्रिकल इंजिनेरींग डिपार्टमेंट मध्ये पी एच डी अभ्यासक्रमासाठी उच्च विद्यावेतनासहित निवड झाली आहे. विनय, ऑर्गेनिक ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर काम करणार आहे. विनयला त्याच्या संशोधनासाठी दरमहा १.५ मिलिऑन कोरियन वोन म्हणजेच ९५०००/- रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉ प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्यासह नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे प्रभारी संचालक प्रा डॉ किरणकुमार शर्मा व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page