विश्वकर्मा विद्यापीठातर्फे “विख्यात २.०” या वार्षिक प्रदर्शनाचे शुक्रवारपासून आयोजन
स्थापत्यशास्त्र आणि इंटेरियर डिझाईन प्रदर्शनाचे बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजन
पुणे : शहरातील आघाडीचे खाजगी विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या स्थापत्यशास्त्र आणि इंटेरियर डिझाईन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना थेट त्यांनी तयार केलेल्या कल्पनांचे सादरीकरण करून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी “विख्यात २.०” या वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दि. १२ एप्रिल ते रविवार दि १४ एप्रिल या कालावधीत बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले असून सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वास्तुविशारद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट पुणे विभागाचे अध्यक्ष विकास अचलकर आणि लोवेकर डिझाइन्स असोसिएटचे अश्विन लोवेकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल, उपाध्यक्ष डॉ तृप्ती अगरवाल, प्रा डॉ वासुदेव गाडे आणि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ सिद्धार्थ जबडे हे उपस्थित राहणार अहेत.
विश्वकर्मा विद्यापीठ हे कायम समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा अभ्यासक्रमात समावेश करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असते. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून बहूविद्याशाखीय दृष्टिकोन लक्षात ठेवून समकालीन प्रश्नांवर काम करत असते. “विख्यात २.०” हे प्रदर्शनदेखील याचाच एक भाग आहे. याविषयी बोलताना स्थापत्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता श्रेयस परांजपे म्हणाले की, “अशाप्रकारच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी केलेली कामे, त्यांच्या कल्पनांचे मूर्त स्वरूप तसेच त्यांचे शैक्षणिक यश हे लोकांपुढे आणण्यास मदत होते. या क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मूल्यमापन करण्यास मदत होते. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.
हे प्रदर्शन शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.