संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एम बी ए च्या विद्यार्थ्यांचे डी-मार्ट मध्ये प्लेसमेंट
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले अभिनंदन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील व्यवसाय प्रशासन आणि प्रबंधन विभागातील विद्यार्थ्यांनी व्यापार क्षेत्रातील आघाडीच्या प्रतिष्ठीत अशा डी-मार्टमध्ये मिळवून आपली उत्कृष्टता दाखविली आहे. 10 विद्यार्थी मुलाखतीसाठी गेले होते, त्यातील 9 विद्यार्थ्यांना 90 टक्के स्थान मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यवसाय प्रशासन व प्रबंधन विभाग आणि विद्यापीठासाठी मोठ्या आनंदाची बाब आहे.
विभागाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट समन्वयक प्रा व्ही आर ऑगस्टीन एक मार्गदर्शक म्हणून प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. प्रो ऑगस्टीन यांचे सतत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांना चालना, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मनगटे व अनिकेत घाटोळ यांनी प्युमामध्ये पदे मिळविली आहेत, आदर्श याने सेल्स असोसिएट, अनिकेत याची स्टोअर पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे डी-मार्टमध्ये एमबीए विभागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांची विभाग व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रज्वल डोंगरदिवे, अभय राठोड, अल्ताफ शाह, अनिकेत आवारे, रुचिता ठाकरे, प्रिती टेंभुर्णे, पूजा करुतळे, सेजल पातुर्डे आणि साक्षी जांभोळे यांनी उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य आणि धोरणात्मक विचारांचे प्रदर्शन केले आहे. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, एम बी ए विभागप्रमुख डॉ दिपक चाचरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
एम बी ए विभागातील विद्यार्थ्यांचे दरवर्षी शंभर टक्के प्लेसमेंट होण्यासाठी प्रशिक्षण व सातत्याने प्रयत्न केल्या जाते. विभागाव्दारे सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांची फलश्रृती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे होणारे प्लेसमेंट यात आहे. भविष्यात आणखी प्लेसमेंट कॅम्पचे आयोजन करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांना सक्षम रोजगार देण्याचा विभागप्रमुख म्हणून माझा यशस्वी प्रयत्न असून कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे मार्गदर्शन बहुमूल्य ठरले.
डॉ दिपक चाचरकर, एम बी ए विभागप्रमुख