एमजीएम विद्यापीठामध्ये ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ राष्ट्रीय परिषदेस आजपासून सुरूवात
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड, एमजीएम स्कूल व एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय आणि उच्च शिक्षणावर आधारित ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आज सकाळी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी, एमजीएमचे अध्यक्ष तथा माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त डॉ सुधीर कदम, विश्वस्त विश्वास कदम, विश्वस्त डॉ नितीन कदम, परिषदेच्या सुकाणू समितीमध्ये डॉ विलास सपकाळ, डॉ विजयम रवी, डॉ आशिष गाडेकर, परिषदेच्या समन्वयक डॉ अपर्णा कक्कड, कॉन्फरन्स चेअर रणजीत कक्कड, प्रोग्रॅम चेअर डॉ नम्रता जाजू व सर्व संबंधित उपस्थित होते.
‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर उद्घाटनपर सत्रात कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी ‘जॉईनिंग दि डॉट्स : लीडरशिप रोल्स ऍक्रॉस स्कुल अँड हायर एज्युकेशन’ या विषयावर, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेच्या कुलगुरू डॉ शशिकला वंजारी यांनी ‘एज्युकेशन प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी – व्हिजनिंग दि फ्युचर बाय ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन’ या विषयावर तर भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालन डॉ भीमराय मेत्री यांनी ‘कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ एज्युकेशनल लीडर्स फॉर डिसिजन मेकिंग – व्हाय चॉइसेस मॅटर’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
‘इन्व्होकेशन अँड को – क्रियेटिंग दि एन्सो’ या उपक्रमांद्वारे विविध रंगांच्या माध्यमातून परिषदेचा लोगो काढून मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाची सुरूवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेडचे संचालक तथा कॉन्फरन्स चेअर रणजीत कक्कड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी कांगरिया, पलक वर्मा व निहारिका कपूर यांनी केले. ‘बी दि चेंज’ ही परिषदेची या वर्षीची थीम असून देशभरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ञ उपस्थितांशी विविध विषयांवर तीन दिवस संवाद साधणार आहेत.