‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रा डॉ मेघा महाबोले सेवानिवृत्त

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ मेघा प्रमोदराव महाबोले ह्या दि ३१ मार्च रोजी नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि २ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, साडी, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, अधिष्ठाता डॉ एम के पाटील, संकुलाचे संचालक डॉ ए सी कुंभारखाने, प्र-वित्त व लेखाधिकारी महमद शकील यांची विशेष उपस्थिती होती.

Prof. Dr. Megha Mahabole of 'Swaratim' University Retired

डॉ मेघा महाबोले ह्या विद्यापीठामध्ये दि २ सप्टेंबर १९९६ रोजी अधिव्याख्याता या पदावर रुजू होवून ते वरिष्ठ प्राध्यापक पदापर्यंत पोहचल्या होत्या. विद्यापीठाला त्यांनी एकूण २७ वर्षे ७ महिने सेवा दिली आहे. या काळात प्रा महाबोले यांनी संकुलाच्या संचालक पदीही काम केले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरही त्यांनी केलेले आहे. या दरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.  

Advertisement

या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी सेवानिवृत्त प्राध्यापकास त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, डॉ टी ए कदम, डॉ डी डी पवार, डॉ के ए बोगले, डॉ दिपक पानसकर, डॉ अविनाश कदम, डॉ संगीता माकोने, डॉ शैलजा वाडीकर, डॉ उषा सांगळे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही त्यांच्या पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदिश कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page