आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे दैदिप्यमान यश
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले कौतुक
अमरावती : आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूंनी तीन स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितीय स्थान प्राप्त करुन दैदिप्यमान यश मिळविले. 37 वा आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव नुकताच पंजाब अॅग्रीकल्चर युनिवर्सिटी, लुधियाना येथे पार पडला. देशभरातील विविध विद्यापीठांतील निवडक विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने तीन स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितीय स्थान मिळविले.
यामध्ये मोहम्मद अबसार मोहम्मद साबीर याला लाईट व्होकल गझल स्पर्धेमध्ये प्रथम, आदित्य वरणकर याला स्पॉट पेंटिंग स्पर्धेत प्रथम, ऋषिकेश दुधाळे याला पाश्चिमात्य वादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. स्पर्धेमध्ये साथीदार म्हणून सर्वेश पाठक, भूषण वानखेडे, अभिजित भावे यांनी सहभाग नोंदवला. तर व्यवस्थापक म्हणून डॉ सावंन देशमुख यांनी काम पाहिले. या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थी, साथीदार व व्यवस्थापक यांचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.