एमजीएम विद्यापीठात ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड, एमजीएम स्कूल व एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय आणि उच्च शिक्षणावर आधारित ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गुरूवार, दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. ‘बी दि चेंज’ ही परिषदेची या वर्षीची थीम असणार असून यामध्ये देशभरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ञ उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. दिनांक ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ही परिषद असणार आहे.

या परिषदेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या तिन्ही दिवशी शेवटचे सत्र झाल्यानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे एज्युकेशनल ब्रॅण्डिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी, दि न्यू ऑर्डर ऑफ लर्निंग आणि को – क्रिएटिंग एज्युकेशनल पाथवेज – ऍम्प्लिफायिंग स्टेकहोल्डर्स व्हाईसेस या विषयांवर तज्ञ मंडळी चर्चा करणार आहेत.  

परिषदेत सहभागी होणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

Advertisement

टी आर डूंगाजी, टाटा सर्व्हिसेस, मुंबई; डॉ शशिकला वंजारी, कुलगुरू, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था; डॉ भीमराया मेत्री, संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर; डॉ. सुदर्शन  अय्यंगार, माजी कुलगुरू, गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद; एमजीएम विद्यापीठ, छत्रपती  संभाजीनगर; डॉ निहारिका वोहरा, प्राध्यापिका, आयआयएम, अहमदाबाद; डॉ चंद्रभूषण शर्मा, संचालक, स्कूल एज्युकेशन, इग्नू,नवी दिल्ली; डॉ प्रविणसिंह के सोलंकी, प्राध्यापक, एनआयडी, अहमदाबाद; डॉ अरुण के टांगिरला,प्राध्यापक, आयआयटी मद्रास; डॉ विजयम रवी, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, मुंबई; मोनिका कपूर, सीईओ, स्किल शेयर इंडिया; डॉ अंजुली आहूजा, फिजिक्स फॅकल्टी, कॅनडा; पेट्री लुनास्कोर्पी,  सीईओ, डीटॅक टेक लि फिनलँड; डॉ केल्विन आर्मस्ट्राँग, कॅनडा; डॉ पार्वती दत्ता, संचालिका, विद्या अरण्यम एमजीएम संकुल, छत्रपती संभाजीनगर; रवी देशपांडे, संस्थापक, व्हायनेस वर्ल्डवाईड, मुंबई इ तज्ञ मान्यवर उपस्थितांशी विविध शैक्षणिक विषयांवर संवाद साधणार आहेत.

या परिषदेला एमजीएमचे अध्यक्ष तथा माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त डॉ सुधीर कदम, विश्वस्त विश्वास कदम व विश्वस्त डॉ नितीन कदम आदि मान्यवर परिषदेचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. परिषदेच्या सुकाणू समितीमध्ये डॉ विलास सपकाळ, डॉ विजयम रवी, डॉ आशिष गाडेकर तर परिषदेच्या समन्वयक म्हणून डॉ अपर्णा कक्कड या काम पाहत आहेत. एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेडचे संचालक तथा कॉन्फरन्स चेअर रणजीत कक्कड, प्रोग्रॅम चेअर म्हणून डॉ नम्रता जाजू व सचिव म्हणून नूतन देशपांडे या काम पाहत आहेत.

या परिषदेत देशभरातील शालेय, उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक, प्राध्यापक, संशोधक मान्यवर मंडळी सहभागी होणार असून हे या राष्ट्रीय परिषदेचे दुसरे वर्ष आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करण्यासाठी https://mgmeducationunlimited.com/ , https://lef.mgmu.ac.in/ या संकेतस्थळास भेटू देऊ शकता अथवा ९८८१०१००३२, ९९२३२०८८१०, ८४४६४६०६९६ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेच्या समन्वयक डॉ अपर्णा कक्कड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page