एमजीएम विद्यापीठात पॉश कायद्याबद्दल जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये अंतर्गत तक्रार समितीच्यावतीने ‘पॉश’ (प्रीव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट अॅक्ट) कायद्यासंदर्भात दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात बुधावर, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी ऍड रीना मानधनी यांनी शिक्षकांसाठी तर दिनांक २८ मार्च २०२४ रोजी प्रा स्मिता अवचार यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ‘पॉश – स्टॅन्ड अप, स्पिक आऊट प्रिव्हेंशन, प्रोव्हीबेशन अँड रिड्रेसल’ या विषयावर संवाद साधला.
यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अंतर्गत तक्रार समितीच्या पीठासीन अधिकारी प्रा विजया मुसांडे, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
एमजीएम विद्यापीठाचा हा परिसर महिलांसाठी सुरक्षित असून विद्यापीठात लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जाते. विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीमध्ये डॉ विजया मुसांडे, डॉ झरताब अंसारी, डॉ आशा देशपांडे, आरती राऊलवार, सहायक कुलसचिव प्रदीप गिऱ्हे, प्रा स्मिता अवचार आदींचा समावेश आहे.