स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उन्हाळी -२०२४ परीक्षेसाठी सज्ज

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२४ परीक्षेची पूर्ण तयारी परीक्षा विभागाने केली आहे. या परिक्षा चार टप्प्यामध्ये होणार आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी दि. २ एप्रिल पासून सुरू होणार आहे.

दुसरा टप्पा दि १६ एप्रिल पासून सर्व पदव्युत्तर व सर्व बी. होक अभ्यासक्रमासाठी आहे. तिसरा टप्पा सर्व विधी अभ्यासक्रमासाठी दि २९ एप्रिल पासून सुरू होणार आहे. चौथा टप्पा सर्व शिक्षण व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी दि ३ मे पासून सुरू होणार आहे. आणि पाचवा टप्पा सर्व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी दि १३ मे पासून सुरू होणार आहे.

Advertisement

पहिल्या टप्प्यातील पदवीच्या परीक्षा दि २ एप्रिल पासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील एकूण १०५ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी एकूण ३४ दक्षता/ भरारी पथकांची निवड विद्यापीठाकडून करण्यात आलेली आहे.

उन्हाळी-२०२४ या परीक्षेचे निकाल ३० दिवसात जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page