एमजीएम विद्यापीठात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात रक्ताची असणारी गरज लक्षात घेता महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या रक्तदान शिबिरात ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातर्फे कायम अशा पद्धतीचे उपक्रम राबविले जात असून यामध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी हिररीने सहभागी होत असतात. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संचालक डॉ बी एम पाटील, प्रशासकीय प्रमुख प्रा पियुष काळे, प्रा जे ए सिद्धिकी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा दानिश अली, प्रा यु एम प्रभणे, एमजीएम रुग्णालायचे कर्मचारी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.