अहमदनगर जिल्ह्यातील ध्वजनिधी संकलनात महात्मा फुले कृषि विद्यापीठ अग्रस्थानी
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजनिधी संकलनामध्ये विद्यापीठाने निधी संकलनाच्या उद्दिष्ठापेक्षा १२१ टक्के जास्त ध्वजनिधी संकलीत करुन जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
यावर्षीचा विद्यापीठात संकलन केलेला ध्वजनिधी रु. १८,४३,७८३/- चा धनादेश महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांना सुपुर्त केला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील व पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ विठ्ठल शिर्के उपस्थित होते. यावेळी ध्वजनिधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृतीचिन्ह देवून विद्यापीठाचा गौरव केला.