एमजीएम विद्यापीठात उन्हाळी सुट्ट्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकण्याची संधी
इयत्ता १०, ११ व १२ च्या विद्यार्थ्यांसाठी समर स्किल सर्टिफिकेट प्रोग्रॅम
छत्रपती संभाजीनागर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात इयत्ता १०, ११ आणि १२ च्या विद्यार्थ्यांचा विचार करीत त्यांना स्वत: तील कौशल्य वाढविण्यास मदतशील ठरणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये करता येणाऱ्या या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात हॉबी फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग अँड एडिटिंग, रेडिओ जॉकी, ऍक्टिंग फॉर फिल्म अँड ड्रामा, पब्लिक स्पिकिंग, बेसिक फ्रेंच/जर्मन, प्रॉडक्ट डिझाईन, पेंटिंग, स्कल्पटिंग, डिझाईन थिंकिंग, मोबाईल ऍप डेव्हलमेंट, वेब डेव्हलपमेंट, पोट्टरी, बांबू आर्ट, खादी व्हेविंग, कॉंटिनेंटल/बेकरी/मॉकटेल मेकिंग, ड्रोन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक व्हेईकल, रोबोटिक्स, ३ डी प्रिंटिंग, ऍनिमेशन, पायथॉन, म्युजिकल इन्स्ट्रुमेंट आदींचा समावेश करण्यात आला आहे.
समर स्किल सर्टिफिकेट प्रोग्रॅम’मध्ये विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे कौशल्य व व्यावसायिक शिक्षण मिळणार असून यामाध्यमातून त्यांना आपली क्षमता वृद्धी करता येणार आहे. हा ३० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी www.mgmu.ac.in या संकेतस्थळास भेट देऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०६७६१२००० या क्रमांकावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येणार आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ कायम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले विद्यापीठ असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इयत्ता १०, ११ आणि १२ च्या विद्यार्थ्यांचा विचार करीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा अभिनव उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सुट्टीचा वेळ सत्कारणी लागणार असून विद्यार्थ्यांना आपला छंद जोपासत विद्यापीठात येऊन ज्ञानग्रहण करण्याची एक अमूल्य संधी मिळत आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो.
कुलगुरू डॉ विलास सपकाळ