देवगिरी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : वाणिज्य विभाग देवगिरी महाविद्यालय आयोजित आणि वाणिज्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन “शाश्वत व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योजकतेचे अर्थशास्त्र” या विषयावर दि. २६ व २७ मार्चला करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष इंजिनियर प्रमोद खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे होते तर बीजभाषक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक शंकर जाधव, प्रमुख उपस्थिती म शि प्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश भांडवलदार, आयोजक सचिव तथा उपप्राचार्य प्रो दिलीप खैरनार यांची उपस्थिती होती. परिषदे संयोजक डॉ राजेश लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकात देवगिरी महाविद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर उपप्राचार्य प्रो दिलीप खैरनार, डॉ अनिल आर्द्रड, डॉ अपर्णा तावरे व विद्यापीठातील वाणिज्य विभागातील सर्वांचे मौलिक सहकार्य व मार्गदर्शन लाभले, त्यामुळेच आज या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होत आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे बीजभाषक शंकर जाधव यांनी आपल्या बीजभाषणात व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण व उद्योजकता यांचा शाश्वत विकास करायचा असेल तर पारंपरिक बंधनातून बाहेर पडावे लागेल आणि नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील.संशोधकांनी संशोधन करत असताना नाविन्य निर्मितीवर भर दिला पाहिजे असे सांगितले. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक, प्रमोद खैरणार या प्रसंगी बोलत असताना असे म्हणाले की, आम्ही लोकांना निवास सुविधा पुरविणाऱ्या बांधकाम क्षेत्रात काम करतो. हे एक चांगलं काम आहे परंतु दुसऱ्या बाजूला विचार केल्यास पर्यावरणाची सर्वाधिक हानी ही ह्याच क्षेत्रामुळे होत आहे ह्या गोष्टीची खंत वाटते. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आम्ही 2.0 नेट च्या दिशेने वाटचाल करत आहोत, प्रयत्न करत आहोत. व्यवसाय असो की आणखी दुसरे कोणतेही क्षेत्र शाश्वत विकास करण्यासाठी सर्वांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी.
रिअल इस्टेट उद्योगातील तंत्रज्ञानाची भूमिका अलिकडच्या वर्षांत नाटकीयरित्या विस्तारली आहे कारण ती रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी, विक्री आणि व्यवस्थापित करण्याच्या पद्धती बदलत आहे. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतसा त्याचा उद्योगावर होणारा परिणाम अधिकाधिक लक्षणीय होत आहे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य प्रो अशोक तेजनकर यांनी भारताने कॅशलेस इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे, तसेच ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे भारताचे स्वप्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत आणि असतील. त्यातून प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठी सर्व आव्हाने आणि संधींना प्रकाशझोतात आणणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद अतिशय कमी कालावधीत आयोजित केली याबद्दल संयोजन समिती अभिनंदनास पात्र आहे असे गौरवउद्गार काढले.
उद्घाटन सत्रामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषेदेच्या पहिल्या परिसंवादामध्ये प्रा सय्यद अझहरुद्दीन यांनी शाश्वत व्यवसाय उद्योजकतेसाठी कौशल्य आणि पुन: कौशल्य यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. यानंतर परिषदेच्या पहिल्या दिवशी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने दोन सत्रात ४२ संशोधक विद्यार्थांनी विविध विषयांवर शोधनिबांधचे सादरीकर केले. उकृष्ट शोधनिबांधचे सादरीकर करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सत्कार परिषदेच्या समारोप प्रसंगी करण्यात येणार आहे. या परिषेदचे प्रा दिलीप खैरनार हे आयोजन सचिव, डॉ राजेश लहाने हे संयोजक, सहसंयोजक म्हणून डॉ कैलास ठोंबरे, आणि प्रा सय्यद अझहरुद्दीन यांनी काम पहिले.
या परिषेदेमध्ये १५३ संशोधक विद्यार्थांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. परिषेदेच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागतील प्राध्यापक व संयोजन समितीचे सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो सय्यद अझरूद्दीन यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ अविनाश धोत्रे यांनी केले.