एमजीएम विद्यापीठातील इंटेरियर डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी केला मुंबईचा अभ्यास दौरा

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील इंटेरियर डिझाईन विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्या अंतर्गत मुंबईला भेट दिली. सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधील वार्षिक प्रदर्शन, भायखळ्यातील नाईन फिश आर्ट गॅलरी, पुरातन लाकडी वस्तूंचे संग्रहालय असलेले द ग्रेट इस्टर्न होम्स, तुर्भेतील इकीआ फर्नीचर मॉल आदि ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Advertisement
एमजीएम विद्यापीठाच्या लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आयोजित वार्षिक प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी इंटेरीयर डिझाईन विभागातील मांडणीची माहिती घेताना विद्यार्थी.

या अभ्यास दौऱ्यामध्ये आस्था ठाकरे, साक्षी दरगड, साक्षी कुलकर्णी, श्रुती भारुका, सिद्धी देसरडा, आक्सा कुरैशी, अंकिता चव्हाण, सायली शिंदे, हिमानी कवाडकर व इशिका दुसाद या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा अतुल कुंजर आणि प्रा दर्शना कुंजर हे या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ मोनिका अग्रवाल यांनी या दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page