अमरावती विद्यापीठात ‘संशोधन पद्धती आणि आय पी आर’ या विषयावरील अतिथी व्याख्यान संपन्न
अमरावती विद्यापीठात मान्यवरांचे संशोधन पध्दतीवर मार्गदर्शन
अमरावती : सध्याच्या काळात नवनवीन विषयांवर संशोधन केले जाते. संशोधनातून अनेक नव्या गोष्टींचा शोध लागतो. विज्ञान, वाणिज्य व सामाजिकशास्त्र आदी अनेक क्षेत्रांमध्ये संशोधन अविरतपणे सुरू आहे, असे मार्गदर्शन इंन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड येथील माजी प्राचार्य डॉ पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातंर्गत पदव्युत्तर पदविका योग थेरेपीच्यावतीने ‘संशोधन पद्धती आणि आय पी आर’ या विषयावरील अतिथी व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थान विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी भूषविले, ते पुढे म्हणाले, बौद्धीक पातळी वाढविणे, सामाजिक विकास, नाविन्य प्राप्त करण्यासाठी संशोधन महत्त्वाची प्रक्रिया आहे. संशोधनाचे प्रकार, पायया, येणा-या समस्या आदिंबाबत यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ श्रीकांत पाटील यांनीही विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. आदित्य पुंड, सूत्रसंचालन प्रा राधिका खडके, तर आभार अनिरुद्ध राऊत याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अश्विनी राऊत प्रा वृषाली कडू, शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रयत्न केले.