‘स्वारातीम’ विद्यापीठात आदिवासी साहित्यावर व्याख्यानांचे आयोजन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने व मराठी विभाग आयोजित लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत दि. २२ व २३ मार्च दरम्यान ‘आदिवासी साहित्य : स्वरूप, संकल्पना आणि समीक्षा’ या विषयावर विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे.
पुणे येथील आदिवासी साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर तसेच अमरावती येथील नव्या पिढीचे आदिवासी साहित्य व चळवळीचे अभ्यासक तथा ‘फडकी’ या वाङ्ममयीन नियतकालिकाचे संपादक डॉ संजय लोहकरे हे वरील विषयांवर मांडणी करणार आहेत.
दोन सत्रांमध्ये होणाऱ्या व्याख्यानांचा लाभ विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी अभ्यासक, संशोधक व साहित्यप्रेमींना घेता येईल. तरी भाषा संकुलातील सेमिनार हॉलमध्ये होणाऱ्या या व्याख्यानास विद्यापीठ परिसरातील विविध संकुलातील जिज्ञासू विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व साहित्याची आवड असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहावे, असे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ वैजनाथ अनमुलवाड यांनी कळवले आहे.