‘बालभारती’च्या समितीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ कैलास अंभुरे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील सहायक प्राध्यापक डॉ कैलास माधवराव अंभुरे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ‘बालभारती’ पुणे यांच्या मराठी विषय समितीवर बालभारतीकडून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित येऊ घातलेल्या नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमावर आधारित इयत्ता नववी व दहावी प्रथम भाषा पाठ्यपुस्तक निर्मितीचे कार्य सदरील समितीद्वारे करण्यात येणार आहे. या समितीच्या सदस्यपदी २०२४-२५ पासून डॉ अंभुरे यांची बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी नियुक्ती केली.

Advertisement

डॉ अंभुरे यांची मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी अभ्यासक, समीक्षक म्हणून ओळख असून त्यांचे ‘समीक्षा पद्धती : संदर्भलक्ष्यी’, ‘आशययुक्त अध्यापन पद्धती : मराठी’ हे ग्रंथ प्रकाशित आहेत. याशिवाय ‘वाङ्मय प्रवृत्ती : तत्त्वशोध’ या ग्रंथाचे त्यांनी सहसंपादन केले आहे. ते आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र व विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे ते संचालक आहेत. त्यांनी राजभवन कार्यालय द्वारा पुरस्कृत आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव : इंद्रधनुष्य २०२३ चे सर्वांच्या सहकार्याने यशस्वी आयोजन केले. सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एमजीएम विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर विश्वविद्यालय, इंदोर, आदी ठिकाणी मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page