डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत घवघववित यश
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दत्ता जाधव आणि ओंकार पाटील यांनी गेट २०२४ च्या परीक्षेत घवघववित यश संपादन केले. गेट (GATE) ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी व आयसिटी यांसारख्या नामांकित सरकारी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळन्याबरोबरच अनेक उच्चशिक्षणाचे पर्याय खुले होतात. नुकताच या वर्षीच्या गेट परीक्षेचा निकाल 16 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. ही परीक्षा यावर्षीच्या फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली होती.
गेट (GATE) म्हणजे ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट ही परीक्षा इंजिनियरिंग तसेच लाइफ सायन्सच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. त्याचसोबत या परीक्षेतील गुणांमुळे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजे पीएसयु (PSUs) मध्ये चांगली नोकरी प्राप्त होते. या परीक्षेत दत्ता जाधव याने 604 गुण प्राप्त करून संपूर्ण भारताततून 588 वा क्रमांक तर ओंकार पाटील याने 361 गुण प्राप्त करून 5295 क्रमांक पटकविला. या त्यांच्या यशामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या परीक्षेसाठी डॉ जे जे मगदुम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम, व व्हाईस – चेअर पर्सन अॅड. डॉ सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.