सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलांतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र या विषयावर शुक्रवार दि 22 मार्च रोजी एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे आणि प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ माया पाटील यांनी दिली.
या एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्धाटन कुलगुरु प्रा प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डेक्कन कॉलेज पुणेचे माजी अध्यक्ष डॉ गो बं देगलूरकर, गोवा येथील संत सोहिरोबनाथ अंबीए, कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्सचे डॉ रोहित फाळगावकर, बनारस येथील बनारस हिंदून विदयापीठातील डॉ विराग सोनटक्के, डॉ अरविंद सोनटक्के, डॉ श्रीकांत गणवीर, डॉ शांता गीते आदी उपस्थित राहुन विषयाची मांडणी करणार आहेत. तसेच यावेळी प्र. कुलगुरु डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगीनी घारे उपस्थित रहाणार आहे.
सदर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या अधिक माहितीसाठी प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रा डॉ प्रभाकर कोळेकर, डॉ ज्ञानेश्वरी हजारे, डॉ सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इतिहास, पुरातत्व, सांस्कृती विषयक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे. असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे आणि प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ माया पाटील यांनी केले आहे.