शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात जागतिक महिला दिन साजरा
कोल्हापूर : आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉ कल्याणी कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ आर जी पवार सर होते. डॉ व्ही एन शिंदे यांनी अनेक महिलांचे कारकीर्दीचे उदाहरणे देऊन महिलांनी समाजात केलेले कार्य दर्शवून दिले.
तसेच डॉ कल्याणी कुलकर्णी यांनी भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर या विषयावर व्याख्यान दिले, भावनिक बुद्धिमत्ता जपण्यासाठी टाईम मॅनेजमेंट आवश्यक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यातून आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राखले जाऊ शकते. सुरुवातीस प्राजक्ता पाटील यांनी सांस्कृतिक स्वागत नृत्य सादर केले. सूत्रसंचालन एम ए योगशास्त्राच्या विद्यार्थिनी सौ सुषमा जाधव आणि तन्वी माने यांनी केले, आभार प्रदर्शन गीतांजली खांडेकर यांनी केले.
कार्यक्रमास विभागाचे सहा. प्रा. वाय एस. बोकील, आर. एम. जाधव, उदय घाटे, कानिफनाथ पंढरे, विना मालडिकर, प्रीती चव्हाण, आसावरी कागवाडे, वसंत सिंघन, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.