महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न

अध्यापन, संशोधन व विस्तार सेवेव्दारे ज्ञानाचा प्रसार व्हावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

नाशिक : अध्यापन, संशोधन, विस्तार सेवेव्दारेे ज्ञानाचा प्रसार मोठया प्रमाणात व्हावा असेे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन 2024 मधील प्रथम बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते. या अधिसभा बैठकीस कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प, अ.वि.से.प., वि.से.प., प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला तर लेखा अहवाल डॉ. राजेश डेरे यांनी सादर केला. तसेच विद्यापीठाचा वार्षिक अहवाल डॉ. विभा हेगडे यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी या सभेचे संचलन केले.

दुरस्थ पध्दतीने उपस्थित विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, शिक्षण व आरोग्य शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. विद्यापीठाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, नॅक मानंाकरीता नॅकसेलचा प्रारंभ या कौतुकास्पद बाबी आहेत. अध्यापन, संशोधन, विस्तार, सेवा याव्दारे ज्ञान आणि बुध्दीमत्ता यांचा प्रसार, निर्मिती व जपणूक करणे व समाज जीवनावर परिणामकारक प्रभाव पाडणे हे प्रमुख उदिष्ट डोळयासमोर ठेऊन कार्य केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

याप्रंसगी मनोगतात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)  यांनी सांगितले की, विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक होत आहे. याकरीता विद्यापीठाचा अर्थसंकल्प गुणात्मक व संशोधन कामाला भर देणारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यासाठी कल्याणकारी योजना, मआविवि विद्यार्थी अॅप व विद्यार्थी हा केंद्रबिंदु असुन व्यक्तीमत्व विकास, समुपदेशन यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव जागृती, संशोधनाकरीता विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवास अनुदान देण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे ई-ग्रंथालय कार्यान्वीत करण्यात येणार असून मोठया प्रमाणात पुस्तके व ई-जर्नल्स उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात मोठया प्रमाणावर तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या सन 2024- 2025 अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न रु. 645.40 कोटी इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये 662.55 कोटी इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट रुपये 17.15 कोटी इतकी अपेक्षित आहे. विद्यापीठाचा सन 2024 – 2025 चा अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे.  संशांधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये संशोधन प्रकल्प, कॉन्फरन्स, ट्रॅव्हल ग्रॅन्ट, पब्लीकेशन ग्रॅंन्ट आदींचा समावेश आहे.

कुलगुरु महोदया यांनी तयार केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठातर्फे विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या आहेत याकरीता 550 लक्ष लक्ष रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकरीता धन्वंतरी विद्याधन योजना, बहीःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका योजना, विद्यार्थी अपघात विमा योजना आदी योजनांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या उपक्रमांविषयी मोबाईवर अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी याकरीता अॅप तयार करण्यात येणार असून याकरीता पाच लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक जाणीव जागृती उपक्रमांसाठी रुपये 10 लक्ष, माजी विद्याथी संघटना करीता 25 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

 महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी कल्याण योजना राबविण्यात येतात याकरीता काम करणाÚया समन्वयक व लिपिक यांना मानधन देण्यात येणार असून त्यासाठी 20 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यापीठाच्या कामानिमित्त अन्य शहरात प्रवास करतात सदर प्रवासादरम्यान अपघाती, नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विद्यापीठाकडून मदत म्हणून रक्कम देण्यात येणार आहे.

 विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून संशोधन व विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील विभागीय केंद्रांचे विकास कामे व बांधकामे आदींचा समावेश आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कर्मचारी कल्याण शीर्षातंर्गत रु. 30 लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी खेळात सहभाग घ्यावा यासाठी खेळाचे साहित्य, मैदान आदी करीता 30 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ज्ञान अद्ययावत रहावे यासाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते याकरीता 25 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठात सोलर स्ट्रीट लाईट, क्लिनीकल ट्रायल युनिट, हर्बल गार्डन, सेंटर ऑफ एक्सलन्स, जेनेटिक लॅब, इक्षणा म्युझियम, डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटर व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पासाठी गठीत समितीमध्ये अध्यक्ष डॉ. दिलीप कदम, सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. अरुण दोडामणी, डॉ. फारुक मोतिवाला, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. वाय. प्रविण कुमार, डॉ. राजेश डेरे, डॉ. मिनल मोहगांवकर व वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर यांचा समावेश होता.

या अधिसभेत अधिसभा सदस्य डॉ. मिर्झा अथर, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, डॉ. वाय. प्रविणकुमार, डॉ. पराग संचेती, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. चेतना गोरीवाले, डॉ. मिनल मोहगांवकर, डॉ. हेमलता जळगांवकर, डॉ. गिरीष ठाकूर, डॉ. शिरीष पांडे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. विनोद चौधरी, डॉ. विष्णू बावणे, डॉ. संतोष गटणे, डॉ. सचिन उब्रंेकर, डॉ. विजय बोकारे, डॉ. प्रसाद बनसोड, डॉ. मनिषा सोलंखी, डॉ. महेंद्र गौशल, डॉ. फारुक मोतिवाला, डॉ. राजेश शहा, डॉ. राजीव मंुडाणे, डॉ. सुभाष राऊत, डॉ. चंद्रकांत डेरे, डॉ. लक्ष्मण गायकवाड, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. रामराव भाबड, डॉ. तुकाराम उबारंडे, डॉ. दत्तात्रय जाधव, वैद्य राजेश कापसे, डॉ. रामकिशन ठाकरे, डॉ. भगवान गिरी,  डॉ. सुनिल म्हस्के, डॉ. मोहन जोशी, डॉ. निलिमा राजंस, डॉ. प्रविण चांडक, डॉ. अजय दहाड, डॉ. मिलिंद काळे, महेश बुब, अरुणराव देशमुख, संतोश सानप, ज्योती इटनकर, बापुसाहेब झिने सभागृहात उपस्थित होते तसेच य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. बाबासो माळी, डॉ. आनंद टेंभुर्णीकर, डॉ. निलम अंद्राडे, डॉ. सुरेश दोडामणी आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. व्यंकट गिते, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page