के एस के महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
बीड : केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपतंप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्र माचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण हे एक काँग्रेस नेता स्वातंत्र्यसेनानी,सहकारी नेता व सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी भारताचे वित्तमंत्री,संरक्षणमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या कृष्णाकाठ या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांचे जीवन व कार्य समाजासमोर आले. त्यांनी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,साहित्य इत्यादी सर्वच क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविला आहे.
त्यामुळे त्यांच्या नावाने दिनांक 1 जुलै 1989 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. हे विद्यापीठ देशातील महत्वाच्या विद्यापीठापैकी एक आहे. त्यास युजीसीची मान्यता देखील आहे. या विद्यापीठाला यशवंतराव चव्हाणांचे नाव द्यावे यासाठी कवीवर्य कुसुमाग्रज यांनी आग्रह धरला होता. हे सांगून सर्वांनी त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेवून जीवनात कार्य केल्यास देशाची प्रगती होण्यास उशीर लागणार नाही असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालींदर कोळेकर, डॉ. सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ. विश्वांभर देशमाने, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. विनायक चौधरी, प्रा. आसाराम खुटाळे, डॉ. अनिल शेळके, डॉ. आसाराम चव्हाण, डॉ. बालासाहेब पोटे, डॉ. श्रीमंत तोंडे व प्रा. अमोल घुमरे आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.