उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
जळगाव : राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ते २० मार्च २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भारतीय लोककला (पोवाडा, भारुढ, भजन), भारतीय लोकवाद्य, संकल्पना नृत्य, निबंध, पथनाट्य, समुहगीत, कविता, वक्तृत्व, भित्तीचित्र आदी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा विद्यापीठाचे पदवीप्रदान सभागृह, सामाजिक शास्त्रे प्रशाळा सभागृह, पर्यावरण शास्त्र प्रशाळा सभागृह या ठिकाणी होणार आहेत. १७ मार्च रोजी उद्घाटन होणार असून त्या आधी पथसंचलन होणार आहे. या महोत्सवासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्र्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली समित्यांची बैठक घेण्यात आली. अशी माहिती रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी दिली.