कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अहमदाबाद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधवी ठाकरे यांचे व्याख्यान झाले.
डॉ. ठाकरे यानी चंद्रयान – २ व ३, मार्स मिशन, आदित्य एल-१ या भारतीय अंतराळ संशोधन प्रकल्पांवर काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. एस. टी. बेंद्रे यांनी केले, डॉ. पद्माकर चव्हाण यानी परिचय करून दिला. केतकी चौधरी हिने सुत्रसंचालन केले. तिषा विसपुते हिने आभार मानले. यावेळी डॉ. एस. एस. घोष, डॉ. डी. जे. शिराळे, डॉ. व्ही. पी. शिंदे, डॉ. जसपाल बंगे, उपस्थित होते