एमजीएम विद्यापीठातील टेक्सटाईल आर्टवर्क स्पर्धेत श्रेया आणि स्वाती प्रथम पारितोषिक विजेत्या
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनतर्फे (एलएसओडी) घेण्यात आलेल्या टेक्सटाईल आर्टवर्क स्पर्धेमध्ये श्रेया घोंगडेने प्रथम क्रमांक मिळविला असून प्रियांका गवळे द्वितीय पुरस्कार विजेती ठरली आहे. प्रमोदिनी चक हिची उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘अव्हंत गार्द एक्स्ट्राव्हॅगंझा’ अंतर्गत स्पर्धेसाठी ‘शाश्वत फॅशन’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. यामध्ये स्वाती मगरने प्रथम क्रमांक पटकवला असून आकाश बडोले द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत सानिया शेखला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर व अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.