उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिवचरित्र अभ्यास शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ५ मार्च रोजी शिवचरित्र अभ्यास शिबिर घेण्यात आले.

Advertisement
Shiv Charitra Study Camp concluded with great enthusiasm at North Maharashtra University

शिवव्याख्याते रवींद्र पाटील यानी शिवचरित्रातील बारकावे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध पैलू उलगडून दाखविले. अध्यक्षीय समारोप प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. योगेश माळी यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page