जी एच रायसोनी महाविद्यालयात रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न
पुणे : पुण्याच्या जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगी आणि मॅनेजमेंट येथील स्पोर्टस् मैदानावर तीन दिवसीय रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 24 स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.




या स्पर्धेत पुरुष टेबल टेनिस स्पर्धेत टेनिसपटू शौनक सानपूरकर (जेएसपीएम आरएससीओई, ताथवडे), महिला टेनिस स्पर्धेत खेळाडू समृद्धी कुलकर्णी (एसएनडीटी महिला महाविद्यालय), पुरुष बुद्धीबळ स्पर्धेत बुद्धिबळपटू विनित धूत (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे विद्यापीठ) आणि महिला बुद्धिबळपटू जुई राजेंद्र उबाळे (मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत अनुक्रमे मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर व झील कॉलेज नर्हे पुणे, तर पुरुष व महिला फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे व जीएचआरसीईएम पुणे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. विजेत्य़ांना रोख रक्कम ट्रॉफी देऊन डॉ. आर. डी. खराडकर, कॅम्पस डायरेक्टर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.रायसोनी स्पोर्टस् कार्निव्हलचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांच्या हस्ते करण्यात आले होते. डॉ. आर. डी. खराडकर, कॅम्पस डायरेक्टर, जीएचआरसीईएम, पुणे यांनी सांगितले की हे स्पोर्टस् कार्निव्हल विविध महाविद्यालयातील खेळाडूंना आपल्या गुणांना सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देते.क्रीडा संचालक, GHRCEM डॉ. निशिगंधा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली हे कार्निव्हल यशस्वीपणे पार पडले. यासाठी डॉ. सुधीर हाटे व डॉ. अमोल पोटे यांनी परिश्रम घेतले आहेतकार्निव्हलचे विजेते पुढीलप्रमाणे आहेतटेबल टेनिस :पुरुष:विजेता: शौनक सानपूरकर (जेएसपीएम आरएससीओई, ताथवडे)उपविजेता: ओंकार रसाळ (व्हीआयटी पुणे)स्कोअर: (11-4), (11-3), (11-3)महिला:विजेता: समृद्धी कुलकर्णी (एसएनडीटी महिला महाविद्यालय, पुणे)उपविजेता: आदिती कुलकर्णी (मॉडर्न लॉ कॉलेज, पुणे)स्कोअर: (11-4), (11-8), (11-7)बुद्धिबळ:पुरुष:विजेता: विनित धूत (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तंत्रज्ञान विभाग)उपविजेता: कुलवंतसिंह नामदेव निंबाळकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तंत्रज्ञान विभाग)महिला:विजेते: जुई राजेंद्र उबाळे (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)उपविजेता: वर्षा दत्तराव करंजे (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर)व्हॉलीबॉल निकाल:पुरुष:विजेता : मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर (कर्णधार – विनित शिंदे)उपविजेता: झील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नऱ्हे (कर्णधार – ओम मानकर)स्कोअर: (22-25), (25-14), (16-14)महिला:विजेता : झील कॉलेज नऱ्हे पुणे (कर्णधार- सिद्धी गुरव)उपविजेता: एसआयटीएस नर्हे (कर्णधार – श्रुती मंडले)स्कोअर: (25-19), (18-25), (15-6)फुटबॉल:पुरुष:विजेता : ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (कर्णधार – अथर्व चांडक)उपविजेता: जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगी आणि मॅनेजमेंट (कर्णधार – शुभम आडके)स्कोअर: (5-1)महिला:विजेता: जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगी आणि मॅनेजमेंट (कर्णधार – श्रावणी खराडे)उपविजेता: जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगी आणि मॅनेजमेंट (कर्णधार – वैभवी चलवडे)स्कोअर: (1-0)