महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये सायबर क्राईम जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी ‘अवेरनेस ऑफ सायबर क्राईम अँड सायबर सिक्युरीटी’ या विषयावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या विशेष व्याख्यानाचे ( दि. १ ) विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील, विभागप्रमुख प्रा. एस.आर.राठी, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.


यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविणा यादव या म्हणाल्या की, समकालीन काळामध्ये समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समाजमाध्यमे वापरत असताना जागरूक राहणे आवश्यक असून सर्वांनी सायबर विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आमिषाला बळी पडत अनोळखी लिंकवर क्लीक करू नका. ऑनलाईन पैसे लुटण्याच्या घटना वाढत असून अशी काही घटना आपल्यासमवेत घडली तर तत्काळ आपण सायबर पोलिसांची संपर्क करीत तक्रार करावी, या माध्यमातून आपल्याला योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन मिळते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वरदा जोशी, विवेक इंगळे, श्रुती शिंदे व सर्व संबंधितांनी आपले योगदान दिले.